फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून ट्रान्सफार्मर चोरीचा छाडा… रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाले चोर ५ ट्रान्सफार्मर चोरीचे गुन्हे उघड !

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ९ सप्टेंबर २०२६):- फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुशंगाने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील आरोपी १) राज मिथुन शिंदे, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, २) सनी रमन भोसले, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा यांनी केले असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यावर आरोपींनी बरेच इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर चोरीचे गुन्हे केले असल्याबाब खात्री झाली होती.

रेकॉर्डवरील आरोपी १) राज मिथुन शिंदे, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, २) सनी रमन भोसले, रा. सरडे, ता. फलटण, जि. सातारा यांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपूस केल्यावर त्यांनी त्यांचे इतर साथीदार यांचे मार्फतीने गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.

Screenshot

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन

१. ४२१/२०२६, भा. न्याय सं. कलम ३०३ (३ (५), भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६,

२. ४५५/२६,, भा. न्याय सं. कलम ३०३(३(५), भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६,

३. ४७८/२६, भा. न्याय सं. कलम ३०३ (३ (५), भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६,

४. ४८१/२६. भा. न्याय सं. कलम ३०३ (३ (५), भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६

५. ३९२/२६,, भा. न्याय सं. कलम ३०३(), ३ (५), भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६

हे गुन्हे केले असल्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे व गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Screenshot

मागील १ महिण्यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर व मोटर चोरी असे एकूण १९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी मा. निखिल पिंगळे सो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सो, अपर पोलीस अधीक्षक, मा. धन्यकुमार गोडसे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार प्रभारी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रशांत सुबनावळ सहा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितिन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉस्टेबल हनुमंत दडस यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!