फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २७ ऑक्टोबर २०२६): –
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या लिलावात कांद्याची चांगली आवक नोंदवण्यात आली असून कांद्याचे बाजारभाव खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.
बाजारात लाल आणि गरवा कांद्याची मिळून एकूण १,०३३ क्विंटल म्हणजेच २,०६६ पिशव्यांची आवक झाली. यामध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल किमान २,५०० रुपये, कमाल ६,००० रुपये तर सरासरी ४,३०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
दुसऱ्या बाजूला, गरवा कांद्याला प्रति क्विंटल किमान २,५०० रुपये, कमाल ५,२०० रुपये आणि सरासरी ४,४०० रुपये दर नोंदवला गेला आहे. बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण: कांदा बाजारभाव; लाल कांद्याला मिळतोय कमाल ६,००० रुपये दर
