फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा दि.२८ सप्टेंबर २०२६):- सातारा जिल्ह्यात दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी एकूण १६ ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ-महाराष्ट्रचे करण्यात आलेले आयोजन हे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या पुणे विभागाकरिता लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. रोजगार महाकुंभ-महाराष्ट्रची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल याची जिल्ह्यातील सर्व सहभागी आस्थापना व नोंदणी केलेल्या उमेदवार यांनी नोंद घेण्यात यावी अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र साताराचे सहायक आयुक्त, अ.मु. पवार दिली आहे.
आचार संहितेमुळे २९ सप्टेंबर रोजी होणारा रोजगार महाकुंभ मेळावा पुढे ढकलला

