सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण व आरोग्याबाबत जनजागृती

सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे किशोरवयीन मुलींना आहारविषयक मार्गदर्शन; स्तनदा मातांची गृहभेट

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि २८ सप्टेंबर २०२६): सेवा संकल्प अभियान आणि पोषण माह यांचे औचित्य साधून सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.

किशोरवयीन मुलींनी दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक व संतुलित आहाराचा समावेश करणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे तसेच आरोग्याची काळजी घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या वाढीच्या वयात पोषणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!