फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २ ऑक्टोबर २०२६):-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि सामाजिक सलोख्याच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमास MaRC व्यसन मुक्ती समिती कन्वेनर डॉ. सूर्यकांत दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ. निना कोठारी, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, संचालिका सौ. मनीषा घडिया यांच्यासह ग्रुपचे सदस्य राहुल गांधी, विकास कोठारी, दिनेश उपाध्ये आणि श्रेयांश जैन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
जैन सोशल ग्रुप फलटण तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी; प्रतिमा पूजनाने वाहिली पुष्पांजली

