राजे कल्चरल ग्रुप, जायंटस् सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुपतर्फे १८ ऑक्टोबरला ‘दांडिया धमाल’; मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणात रंगणार २१ वे वर्ष
फलटण टुडे वृत्तसेवा( फलटण दि १२ ऑक्टोबर २०२६):-
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून राजे कल्चरल ग्रुप (फलटण), जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुप (फलटण) यांच्या संयुक्त विद्यमाने केवळ महिलांसाठी मोफत प्रवेश असलेल्या ‘दांडिया धमाल २०२६’ या भव्य गरबा व दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग २० वर्षांची यशस्वी परंपरा जपत यंदा या उपक्रमाचे २१ वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे.

हा भव्य दांडिया महोत्सव रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या प्रांगणात पार पडणार आहे. तालावर थिरकणारी पावले आणि गरबाप्रेमींचा अमाप उत्साह यांच्या संगमाने हा सोहळा यंदाही फलटण शहरात विशेष गाजणार आहे. या महोत्सवामध्ये भाग घेणाऱ्या आणि उत्कृष्ट गरबा व दांडिया डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या महिला व युवतींसाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांसाठी विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत. फूड स्टॉल नोंदणीसाठी
8408 063 737 / 84 22 405 999 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 70 58 155 155/8408063737/84 22 405 999 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
२१ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या या विशेष दांडिया महोत्सवात फलटण शहर व परिसरातील महिलांनी व युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या पारंपरिक व सांस्कृतिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
