निवडणूक यादी निरीक्षकांच्या उपस्थितीत १५ ऑक्टोबरला सातारा जिल्ह्यात आढावा बैठक व पाहणी दौरा


फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. १२ ऑक्टोबर २०२६):- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांची प्रारुप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रारुप मतदार यादी निवडणूक आयोगाचे ‘व्होटर सर्व्हिस पोर्टल’ (https://voters.eci.gov.in/) मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राचे संकेतस्थळ (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/) तसेच सातारा जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.satara.gov.in) नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमातील दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यासाठी मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त असणाऱ्या पुणे विभागाच्या आयुक्त श्रीम. शितल तेली-उगले यांचा गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी द्वितीय सातारा जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दुपारी १.३० ते ३.४५ या वेळेत त्या कोल्हापूरहून पाटण येथे येऊन ERO पाटण कार्यालयास भेट देतील तसेच SIR पाहणी व आढावा घेतील. दुपारी ३.४५ ते ४.१५ या वेळेत २६१-पाटण विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्र. ३०३ (मल्हारपेठ) ची पाहणी करून BLO व मतदारांशी चर्चा करतील. दुपारी ४.१५ ते ४.३० या वेळेत मतदान केंद्र क्र. ३०५ (आबदारवाडी) आणि दुपारी ४.३० ते ४.४५ या वेळेत मतदान केंद्र क्र. ४१४ (सुपने) येथे भेट देऊन पाहणी, BLO व मतदारांशी संवाद साधतील. यानंतर दुपारी ४.४५ ते ५.४५ या वेळेत जि.प. शाळा ल्हासुर्णे येथील मतदान केंद्र क्र. १८४, १८५ व १८६ ची पाहणी करून BLO व मतदारांशी चर्चा केली जाईल. सायं. ५.४५ ते ६.३० या वेळेत ल्हासुर्णे येथून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे येऊन जिल्ह्यातील सर्व ERO व AERO यांची आढावा बैठक घेतली जाईल. त्यानंतर सायं. ६.३० ते ७.०० या वेळेत मॉडर्न इंग्लिश स्कूल कोरेगाव येथील मतदान केंद्र क्र. २३८ व २३९ ची पाहणी करून BLO व मतदारांशी चर्चा केली जाईल. सायं ७.०० ते ७.३० या वेळेत ERO कोरेगाव यांच्या कार्यालयास भेट देऊन SIR पाहणी व आढावा घेतला जाईल आणि रात्री ७.३० वाजता कोरेगाव येथून पुणे जिल्ह्यासाठी प्रस्थान केले जाईल. 
प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने तसेच दावे व हरकतींच्या संदर्भात काही तक्रारी किंवा शंका असल्यास, त्या नागरिकांना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मतदार यादी निरीक्षक यांच्या द्वितीय भेट जिल्हा दौरा कार्यक्रमाच्या आयोजित ठिकाणी मांडता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!