फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- पुणे पदविधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक मतदान 23 ऑक्टोबर रोजी तर मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी व मतदान प्रक्रिया संपेपर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री (एफएल-२) परवानाकक्ष (एफएल-३) बिअरबार (फॉर्म ई) व ताडी दुकान टीडी-१ या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. सदर आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाकडून उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द मद्य निषेध कायदा १९४९ नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल.
पुणे पदविधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने मद्यविक्री बंद
