फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.23 नोव्हेंबर २०२६): इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

नीट, सेट आणि जेईई यांसारख्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची गरज लागते. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यक्षेत्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन प्रस्ताव संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत समिती कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

या प्रवर्गाच्या अर्जदारांनी https://etribevalidity.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने समितीच्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत विहित केलेली आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कपिल टॉवर्स, सी विंग, पाचवा मजला,पुणे आर. टी. ओ. कार्यालयाशेजारी, संगम पुलाजवळ, पुणे – ४११००१. संपर्क क्रमांक: ०२०-२६०५९६६१ वर संपर्क साधावा.


