यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे आरोग्य, आहार आणि प्राणायाम शिबिर उत्साहात संपन्न…

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १६ एप्रिल २०२६ ):-श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजीआर्ट ऑफ लिव्हिंग शाखा फलटण, जायंट्स यशवंत ग्रुप फलटण व जायंट्स सहेली ग्रुप फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य, आहार व प्राणायाम एकदिवसीय शिबिर उत्साहात संपन्न झाले.

प्रथमतः प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड एन एम, उपप्राचार्य श्री घनवट पी.डी, पर्यवेक्षिका सौ गायकवाड सी.आर व जायंटस यशवंत ग्रुप ऑफ फलटण चे अध्यक्ष मा श्री अमरसिंह संताजीराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते प्रमुख मार्गदर्शक मा. सौ डॉ. अलका पोळ मॅडम, मा. सौ नीलिमा दाते मॅडम, मा. सौ जयश्री उपाध्यय मॅडम यांचे स्वागत गुलाब रोप देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या डॉ. नीलिमा दाते मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थी व शिक्षकांना योगासन, प्राणायाम या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग हे जीवन जगण्याची कला शिकविते. प्राणायाम हे शरीरातील ऊर्जा (प्राण) नियंत्रित करण्याचे योगी तंत्र आहे ज्यामुळे मन शांत होते आणि आरोग्य सुधारते.
जीवन जगण्याची कला आत्मसात करायची असेल तर शिक्षण हे खूप गरजेचे आहे. व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीत शिक्षण दिसून येत असते. शिक्षणाने जीवन कसे कलेने जगायचे हे कळते. विद्यार्थ्यांनी दररोज किमान १२ सूर्यनमस्कार घालणे गरजेचे आहे. योगासनामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्राणायामामुळे फुफुसाचे जीवन वाढते. शरीरामध्ये ऊर्जा वाढली की प्रतिकारशक्ती वाढते. मनाची एकाग्रता वाढते, जागरूकता वाढते, आत्मविश्वास , सर्जनशीलता व सर्वांगीण विकास वाढतो. यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे. असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Screenshot

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. अलका पोळ मॅडम यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रवण क्षमता वाढवली पाहिजे. प्रलोभने व मोह याकडे आकर्षित न होता एकाग्रता ठेवून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय प्राप्त केले पाहिजे. खेळ व सात्विक आहार घेणे गरजेचे आहे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे हे अभ्यासाइतकेच महत्त्वाचे आहे. आजचा विद्यार्थी फास्ट फुडचे सेवन मोठ्या प्रमाणात करत असल्याने त्याची पचनक्षमता बिघडत चाललेली दिसून येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बाहेरचे खाणे टाळले पाहिजे आणि आपल्या आहारात ताज्या फळांचा वापर केला पाहिजे असे मत त्यांनी उदाहरणासह स्पष्ट करून सांगितले.

आहार, आरोग्य व प्राणायाम या शिबिरामध्ये मार्गदर्शनाबरोबरच विद्यार्थी व शिक्षकांकडून उपस्थित मान्यवरांनी वेग वेगळ्या प्राणायाम व ध्यानधारणा यांची प्रात्यक्षिक करून घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या श्वासाकडे लक्ष दिले पाहिजे व आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपले आरोग्य हे शांत ठेवणे गरजेचे आहे असे सौ जयश्री उपाध्याय मॅडम यांनी प्रात्यक्षिक करताना उपस्थितांना सांगितले.

याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनींना येणाऱ्या शारीरिक व मानसिक अडचणी विषयी सखोल मार्गदर्शन मान्यवरांनी केले. विद्यार्थिनींनी मान्यवरांशी मनमोकळेपणे संवाद साधून मनातील प्रश्न व समस्या मान्यवरांसमोर मांडून त्यावर सुसंवाद साधला.

जायंंटस यशवंत ग्रुप ऑफ फलटण आणि जायंटस सहेली ग्रुप ऑफ फलटण तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे कौतुक विद्यार्थ्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ तगारे एस. एम. यांनी केले.

Screenshot

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!