महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजितकिशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धाआर्यसेना व श्री समर्थ (अ) किशोरी गटात, तर ॐ साईश्वर व ॐ समर्थ किशोर गटात अंतिम फेरीत आमनेसामनेमुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत उत्कंठावर्धक सामनेउपांत्य फेरीचा थरार शिगेला!प्रत्येक गुणासाठी झुंज, प्रत्येक क्षणात रोमांच!

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, ४ मे २०२६ ):-: खो-खोच्या मैदानावर अक्षरशः धुरळा उडवत, प्रेक्षकांच्या श्वास रोखणाऱ्या लढतींसह किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज जबरदस्त थरार पाहायला मिळाला! एकीकडे आर्य सेना आणि श्री समर्थ व्यायाम मंदिर (अ) यांनी किशोरी गटात अंतिम फेरी गाठली, तर दुसरीकडे ॐ साईश्वर सेवा मंडळ आणि ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर यांनी किशोर गटात दणदणीत प्रवेश करत विजेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले!

पहिली उपांत्य फेरी: आर्य सेनेचा अचूक डाव, अंतिम फेरीत धमाकेदार प्रवेश!
या सामन्यात नाणेफेक जिंकत आर्य सेनाने संरक्षण स्वीकारले आणि त्याच रणनीतीने विजयाची पायाभरणी केली. आर्य सेनाने ॐ साईश्वर सेवा मंडळचा ६-४ असा १.२० मि. राखून २ गुणांनी पराभव केला. आर्य सेनाच्या गार्गी शिंदे (४.३०, २.३० मि. संरक्षण), दक्षता घोलप (नाबाद १.२०, २.३० मि. संरक्षण व २ गुण), सौम्या मोरे (१.१०, २ मि. संरक्षण व २ गुण) आणि गार्गी मोरे, रिया गोलवस्कर (प्रत्येकी १ गुण) यांनी संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. तर पराभूत ॐ साईश्वरच्या प्रांजल पाठक (६.३०, १.३० मि. संरक्षण व ३ गुण), श्री कारेकर (३.१० मि. संरक्षण) व मुद्रा जाधव (१ गुण) यांनी झुंजार खेळ केला.

दुसरी उपांत्य फेरी: श्री समर्थ (अ)चा संघर्षमय विजय!
नाणेफेक जिंकून शिवनेरी सेवा मंडळने आक्रमण निवडले मात्र त्याचा फायदा संघाला घेता आला नाही. श्री समर्थ व्या. मंदिर (अ)ने शिवनेरी सेवा मंडळवर ८-६ असा २ गुणांनी विजय मिळवला. श्री समर्थच्या खुशी यादव (२.१०, ५.५० मि. संरक्षण व २ गुण), ग्रंथा वारघडे (१.२० मि. संरक्षण व ३ गुण), अन्वा म्हात्रे (१.५० मि. संरक्षण व १ गुण) व शगुन सेवालिया (२ गुण) यांनी शानदार कामगिरी केली. पराभूत शिवनेरी कडून एल्मा बोऱ्हाडे (५, २ मि. संरक्षण व २ गुण), रिद्धी शिंदे (१.२०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), दुर्वा कोंडुस्कर (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार लढत दिली.

किशोर उपांत्य: ॐ समर्थचा अटीतटीत विजय, अंतिम फेरीत धडक!
नाणेफेक जिंकून सरस्वती स्पोर्ट्स क्लबने संरक्षण स्वीकारले मात्र त्याचा फायदा ॐ समर्थने उठवला. ॐ समर्थ भारत व्या. मंदिरने सरस्वती स्पोर्ट्स क्लबवर १२-१० असा २ गुणांनी विजय मिळवला. ॐ समर्थच्या निहाल शिंदे (३, १.१० मि. संरक्षण व ७ गुण), रुद्र सिंग (३ मि. संरक्षण व ३ गुण), साई निकम (नाबाद १.१० मि. संरक्षण व ३ गुण), ईशान देसाई (१.२० मि. संरक्षण) यांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. तर पराभूत सरस्वती कडून शिवम झा (३.२०, २.२० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय गुप्ता (२.१० मि. संरक्षण व २ गुण), यतीन सावंत (नाबाद १.१०, १ मि. संरक्षण व १ गुण), अनिकेत सोनार (३ गुण) यांनी दमदार खेळ केला..

किशोर उपांत्य: ॐ साईश्वरचा एकतर्फी विजय, अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश!
ॐ साईश्वर सेवा मंडळने विद्यार्थी क्रीडा केंद्रवर १२-४ असा ८ गुणांनी धुव्वा उडवला. ॐ साईश्वरच्या आरव साटम (५.५०, १.१० मि. संरक्षण), श्रातिक गामी (३.४० मि. संरक्षण व १ गुण), अधिराज गुरव (नाबाद २.१० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी संघाला शानदार विजय मिळवून दिला. तर पराभूत विद्यार्थी कडून आर्यन परवडी (३.५० मि. संरक्षण), कार्तिक तोरस्कर (नाबाद १.३०, २ मि. संरक्षण व २ गुण), श्लोक कांबळी (२ मि. संरक्षण), विघ्नेश जाधव (१.४० मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले पण अपुरे ठरले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!