जैनकवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ७ जून २०२६):-
गुरुवार दि. ४ जून २०२६ रोजी मौजे जैनकवाडी येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण,खरीप हंगाम पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शंकाचे निरसन करण्यात आले.
या प्रसंगी जैनकवाडी च्या सरपंच
धनश्री संतोष लोखंडे , तालुका कृषी अधिकारी सचिन हाके , जी.डी.वाघमारे मंडळ कृषी अधिकारी उंडवडी सुपे ,आत्मा विभागाचे विश्वजीत मगर गणेश जाधव उपस्तीत होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. सचिन हाके यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी,एल निनो बाबत खबरदारी घेताना कमी पाण्यावर येणारी, पाण्याचा ताण सहन करणाऱ्या पिकांच्या वाणाचा वापर करावा असे आवाहन करुन कृषी विभागाच्या विविध योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.प्रगतशील शेतकरी डॉ. प्रमोद भगत यांनी सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती काळाची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
महाडिबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण, फळबाग लागवड,ठिबक सिंचन,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना बाबत अनंत घोळवे उप कृषी अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली.
रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बाबत सहाय्यक कृषी अधिकारी संतोष मदने यांनी माहिती दिली व सचिन सूर्यवंशी यांनी आभार मानले.

