फलटण तिडे वृत्तसेवा (फलटण दि ६ मे २०२६):-
‘फलटण येथील प्रसिद्ध कादंबरीकार कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारप्राप्त लेखक मा. सुरेश पां. शिंदे यांना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मा. भालचंद्र नेमाडे सरांनी नुकतच पत्र पाठवून सत्याचा आसूड ही कादंबरी सर्ज्या कादंबरीप्रमाणेच श्रेष्ठ असल्याचं सुचित केलं आहे. ते पत्रात म्हणतात मी ही कादंबरी वाचली. मला ती आवडली या कादंबरीतील गावाकडची ग्रामीण भाषा उत्तम आहे. या कादंबरीत संवाद आणि तपशील जास्त वापरल्यामुळे ‘मी’ ला फार कमी जागा मिळाली आहे. आपण यापुढेसुद्धा असेच एखादे मध्यवर्ती सुत्र पक्के करुन नवीन कादंबरी लिहावी. नेमाडे सरांचं हे पत्र म्हणजे सुरेश शिंदे यांच्या लेखकपणाची पोहोच पावतीच आहे. सरांनी कादंबरी वाचून पत्र पाठविल्याबद्दल सुरेश शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सत्याचा आसूड ही कादंबरी सर्ज्या प्रमाणेच श्रेष्ठ:ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे

