“मुधोजीराजे प्रज्ञा शोध परीक्षा “ बक्षीस वितरण प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण टुडे वृत्तसेवा ( सस्तेवाडी/फलटण,दि.१३ जुलै २०२६):-
फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटी ने सन २०२४/२५ या वर्षा पासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती होऊन भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती मानसिकता तयार करण्याच्या दृष्टीने “मुधोजीराजे प्रज्ञा शोध परीक्षा “ इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या साठी आयोजित करण्यास सुरुवात केलेली होती. या स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम स्वतंत्र प्रश्नपत्रिका संच आणि विशेष तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची इयत्ता निहाय तयारी करून घेतली जाते या स्पर्धा परीक्षेमध्ये १३१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. त्यापैकी पहिल्या एक ते तीन क्रमांकाच्या इयत्तानिहाय १४ विद्यार्थ्यांना चषक,प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन प्रमुख पाहुणे मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी साहेब फलटण एज्युकेशन सोसायटी यांचे व रोप देऊन “मुधोजीराजे प्रज्ञा शोध परीक्षा“विभागाचे सचिव श्री डी एस राजगुडा यांनी स्वागत केले तसेच गटशिक्षणाधिकारी मा. मठपती यांचे स्वागत मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांनी केले. मुख्याध्यापिका वैशाली जाधव यांनी अध्यक्ष वसुंधरा राजीव नाईकनिंबाळकर यांचे स्वागत केले. सौ कुचेकर ,सौ काकडे आणि सौ गोसावी यांनीही इतर मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी फलटण एज्यूकेशन संस्थेच्या पाच प्राथमिक शाळा असून इयत्ता पहिली ते चौथी मध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारी कु स्वराली दोशी या विद्यार्थिनीला मानाचा चॅम्पियन चषक देऊन श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते गौरविण्यात आले

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजांनी म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला निर्भीडपणे सामोरे जाऊन येणाऱ्या ए आय च्या शिक्षण प्रणालीला सामोरे गेले पाहिजे स्पर्धा परीक्षेची तयारी हा भावी यशस्वी जीवनाचा पाया आहे त्यासाठी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांची मानसिकता सकारात्मक दृष्टीने घडविली पाहिजे आणि ही जबाबदारी शिक्षक नक्कीच पार पाडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .
तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकास पारितोषिक रोख रक्कम,प्रमाणपत्र व चषक, द्वितीय क्रमांकास पारितोषिक रोख रक्कम , प्रमाणपत्र व चषक आणि तृतीय क्रमांकाला पारितोषिक रोख रक्कम , प्रमाणपत्र व चषक देऊन शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ.वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर प्रमुख पाहुणे पंचायत समिती फलटणचे गटशिक्षणाधिकारी श्री. सी जे मठपती. फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य श्री शिरीष भोसले ,श्री चंद्रकांत पाटील, श्री रणजीत निंबाळकर ,सौ. नूतन अजितराव शिंदे ,फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गटशिक्षणाधिकारी मा श्री मठपती यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धा परीक्षांना बसवावे जेणेकरून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यास सक्षम बनतील हा विश्वास व्यक्त करत फलटण एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित या स्पर्धा परीक्षेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सौ. दमयंती कुंभार पंचायत समिती यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रशासनाधिकारी श्री अरविंद निकम सर यांनी स्पर्धा परीक्षेची स्थापना आणि स्पर्धा परीक्षेची गरज याविषयी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव यांनी केले अहवाल वाचन मुख्याध्यापिका श्रीमती अनिता राणी कुचेकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय सौ. साळुंखे मॅडम यांनी करून दिला या कार्यक्रमास केंद्रप्रमुख धुमाळ, श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सागर निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु डी चव्हाण. श्रीमंत मालोजीराजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व गुरुद्रोणा अकॅडमीचे व्यवस्थापक श्री अविनाश नरुटे सर. मालोजी राजे शेती विद्यालयाचे प्राचार्य श्री बी डी काळे सर दैनिक ऐक्य चे वार्ताहर श्री मुगुटराव कदम, गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि पाचही शाळांचे सर्व शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते या सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शनाचे काम मुख्याध्यापक श्री रुपेश शिंदे सर यांनी पार उत्तम रीतीने पाडले. सौ. अहिरेकर मॅडम आणि सौ. गायकवाड मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.

