मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात १३ ते १७ ऑक्टोबर दरम्यान अनंतमाला देवी शारदीय नवरात्रोत्सव; मुख्याध्यापिका अनिता कुचेकर यांची माहिती

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १६ ऑक्टोबर २०२६): –
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात प्रतिवर्षाप्रमाणे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात अनंतमाला देवी शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर ते शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान शाळेच्या प्रांगणात साजरा होत असल्याची अधिकृत माहिती मुख्याध्यापिका सौ. अनिता राणी कुमार कुचेकर यांनी दिली आहे.


विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी आणि लोकपरंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने दरवर्षी मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. या पाचदिवसीय उत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी श्री देवीची स्थापना, आरती, धार्मिक विधी तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


फलटण एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या नवरात्र उत्सवात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापिका सौ. अनिता कुचेकर यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!