मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या कु. आर्या दादासाहेब साळुंखेने काव्यस्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

बक्षीस वितरण समारंभात मा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच ज्येष्ठ लेखक व कवी व. बा. बोधे यांच्या शुभहस्ते श्रीमंत मालोजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारताना आर्या सळूखे व इतर मान्यवर

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि १४ जुलै २०२५):-

श्रीमंत निर्मलादेवी नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. 10 जुलै 2026 रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे आयोजित काव्यगायन व काव्यवाचन स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथील विद्यार्थिनी कु. आर्या दादासाहेब साळुंखे हिने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल सोमवार, दि. 13 जुलै 2026 रोजी आयोजित विशेष समारंभात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच ज्येष्ठ लेखक व कवी व. बा. बोधे यांच्या शुभहस्ते श्रीमंत मालोजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने तिला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी कु. आर्या साळूखे हिच्या यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. वनिता लोणकर यांचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा विधान परिषदेचे विद्यमान सदस्य मा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार श्री दीपकराव चव्हाण, फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळ सदस्य, प्रशासन अधिकारी अरविंद निकम , प्रशालेचे प्राचार्य श्री. व्ही. के. शेडगे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री. एस. एस. माने,माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य ए वाय ननावारे , पर्यवेक्षक आर बी निंबाळकर , सौ पूजा पाटील, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा! दिल्या .

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!