मुधोजी हायस्कूलमध्ये वृक्षारोपण करून इयत्ता ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि १९ जुलै २०२६): –
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे दि. १५ जुलै २०२६ रोजी इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

प्राचार्य श्री. व्ही. के. शेडगे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री. एस. एस. माने, पर्यवेक्षक श्री. आर. बी. निंबाळकर व पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी इयत्ता ११ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

तसेच ज्युनिअर विभागातील वृक्षारोपण विभागाचे प्रमुख श्री. एस. डी. तावरे, स्टाफ सेक्रेटरी श्री. एम. डी. ढावरे, तसेच सदस्य श्री. एस. बी. बोराटे, श्री. एस. बी. घाटे, श्री. आर. ए. क्षीरसागर व कु. डी. डी. क्षीरसागर यांनीही वृक्षारोपण उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य श्री. व्ही. के. शेडगे यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात निसर्गाचे रक्षण करणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची आणि विशेषतः तरुण पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री. एस. एस. माने यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील संदेश प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमामुळे इयत्ता ११ वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला. वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते तसेच विद्यार्थ्यांचा निसर्गाशी जवळचा संबंध निर्माण होतो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!