मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये वृक्षारोपण करून11 वी च्या नवगतांचा स्वागत समारंभ संपन्न….

प्रसिद्धी विभाग प्रतिनिधी: फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण या ठिकाणी दि.15/7/2026 रोजी इ. 11 वी सर्व विद्यार्थ्याच्या प्रवेशोत्सव संपन्न झाला.

यानिमित्ताने प्रशालेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री. व्ही. के. शेडगे सर, उच्चमाध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री. एस.एस. माने सर, पर्यवेक्षक श्री. आर.बी. निंबाळकर सर, पर्यवेक्षिका सौ. पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी इ. 11 वी व 7 वी च्या विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून वृक्षारोपण केले. तसेच ज्युनिअर विभागातील शिक्षक वृक्षारोपण विभागाचे प्रमुख श्री. एस. डी. तावरे , स्टाफ सेक्रेटरी श्री. एम.डी. ढावरे, व सदस्य श्री. एस. बी. बोराटे ,श्री. एस. बी. घाटे ,श्री.आर. ए. क्षीरसागर, कु. डी. डी. क्षीरसागर, यांनी खड्डे खोदून वृक्षारोपण केले.

प्राचार्य श्री. शेडगे सर यांनी वृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व समजावून सांगितले ग्लोबल वार्मिंग च्या काळात निसर्गाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची विशेषतः तरुण पिढीची (विद्यार्थ्यांची) जबाबदारी आहे. असे मार्गदर्शन केले. उच्च माध्यमिक विभागातील उपप्राचार्य श्री. माने सर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील संदेश प्रत्यक्ष कृतीत आणणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले.

   या उपक्रमामुळे इ. 11 वी च्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश मिळाला.वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो. आणि विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडली जाते. यामुळे पर्यावरण रक्षणाचा व संवर्धनाचा  संदेश विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये दिला जातो.


   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.....
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!