फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण ,दि २० जुलै २०२६):-
फलटण डॉक्टर्स असोसिएशन ची नुकतीच २०२६-२७ ची वार्षिक सभा संपन्न झाली.या सभेमध्ये फलटण डॉ. असोसिएशन च्या अध्यक्षपदी फलटण मधील प्रसिद्ध डॉ. श्री निनाद दोशी, उपाध्यक्ष पदी डॉ.श्री चेतन गुंदेचा, महिला उपाध्यक्ष पदी डॉ.सौ.शिल्पा गांधी, सचिव पदी डॉ.श्री. निखिल गांधी, खजिनदार पदी डॉ. श्री. सागर तेली यांची निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष डॉ श्री बि.के. यादव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्री निनाद दोशी व नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

दिगंबर जैन जागरण युवा संघाचे प्रवक्ते असलेले व जैन सोशल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य असलेले डॉ. श्री निनाद दोशी व डॉ. सौ. शिल्पा गांधी, तसेच नुतन पदाधिकारी डॉ.श्री .निखिल गांधी डॉ.श्री.चेतन गुंदेचा, डॉ.श्री. सागर तेली यांचे लायन्स उप प्रांत पाल श्री.मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुप चे अध्यक्ष श्री.श्रीपाल जैन, लायन्स क्लब फलटण वेलनेस वाॅरिअर्स चे व दिगंबर जैन , जागरण युवा संघाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र कोठारी यांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.नुतन अध्यक्ष डॉ.श्री निनाद दोशी यांनी फलटण डॉक्टर्स असोसिएशन ने दिलेली अध्यक्ष पदाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने व कल्पकतेने पार पाडु असे प्रतिपादन यावेळी केले.


