फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि २४ जुलै २०२६):-
फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे गुरुवार दि .२३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती चे औचित्य साधून त्याना अभिवादन करण्यात आले
यावेळी प्रशाले चे प्राचार्य बी डी काळे तसेच उपमुख्यध्यापक राजेंद्र माडकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले .
यावेळी सौ. राजश्री शिंदे व सौ. विद्या मोहिते यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शिक्षणाविषयीची भूमिका आणि सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली तसेच त्यांच्या विचारांचा विद्यार्थी व शिक्षकांनी आदर्श घेऊन राष्ट्रसेवेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले .
कार्यक्रमाचे आभार सौ विद्या मोहिते यांनी केले.

