मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज ची विद्यार्थिनी कुमारी शिवांजली शालिनी रणधीर भोसले हिची ड्रग इन्स्पेक्टर पदी नेमणूक..

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २४ जुलै २०२६ सुरेंद्र फाळके):-महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत सन 2025-26 सालातील घेण्यात आलेल्या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्यु. कॉलेज फलटण ची विद्यार्थीनी कु. शिवांजली शालिनी रणधीर भोसले. हिची ड्रग इन्स्पेक्टर पदी निवड झाली.

ज्यु. कॉलेज मध्ये असताना तिने वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता.
या सर्वामध्ये.. मी सावित्री माई फुले बोलतीये.. ही तिने केलेली एकांकिका.. खूप आवडली होती. असे तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिके ने सांगितले.
तिने मिळवलेल्या.. यशाबद्दल अभिमान आहे. असे प्राचार्य व उपप्राचार्य यांनी उदगार काढले.

कु. शिवांजली हिने मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधापरिषदे चे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा आमदार दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटी चे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्र शाळेचे प्राचार्य श्री बाळकृष्ण काळे. उपप्राचार्य पूनम कदम काकडे,तिला शिकवणारे सर्व शिक्षक, ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!