नागरिकांच्या आरोग्यासाठी शासन कटिबद्ध : सुनेत्रा पवार

सावळ येथील आरोग्य सेवेचा शुभारंभ

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती, दि ३० ऑगस्ट २०२६):-
नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे ,शासनाच्या विविध योजनेचा त्यांना लाभ घेता यावा या साठी अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर केला जात आहे.राज्यातील जनतेचे आरोग्य उत्तम रहावे या साठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

सावळ येथील ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं २६ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हस्ते उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी उपस्तीत यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले.

Screenshot

या प्रसंगी पंचायत समिती सभापती किरण तावरे,उपसभापती शुभांगी आगवणे, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी शिंदे , गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी ,डॉ. मनोज खोमणे वंजारवाडी सरपंच जगन्नाथ वनवे,सागर दराडे,सावळ च्या सरपंच तृप्ती जितेंद्र विरकर, उपसरपंच चेतन आटोळे व प्रवीण आटोळे ,सुनील आवाळे,विठ्ठल आटोळे,बाळासाहेब विरकर आदी मान्यवर उपस्तीत होते.

Screenshot

माता बाल आरोग्य,माता बाल लसीकरण दैनंदिन बाह्य रुग्णसेवा, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार अंतर्गत रक्तदाब, मधुमेह तपासणी व उपचार तसेच कॅन्सर प्राथमिक तपासणी व संदर्भ सेवा आदी सेवा सावळ व वंजारवाडी गावातील नागरिकांना मिळणार असल्याचे सरपंच तृप्ती जितेंद्र विरकर यांनी सांगितले
आभार ग्रामविकास अधिकारी राहुल सरक यांनी मानले

Screenshot

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!