फलटण टुडे वृत्तसेवा (भवानीनगर दि २७ सप्टेंबर २०२६):
सणसर येथील आझाद तरुण मंडळाने आयोजित केलेल्या श्री गणेशोत्सव 2026 मधील कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या हा खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये येथील सुनिता धनंजय गाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणी व सोफा सेट हे बक्षीस जिंकले.

येथील आझाद तरुण मंडळाने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. विजेत्यांसाठी लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये सणसर परिसरातील अनेक ज्येष्ठ महिलांसहीत सुमारे 600 महिलांनी सहभाग घेतला. द्वितीय क्रमांक सिंगल कपाट व पैठणी प्रियंका योगेश गाडे, तृतीय क्रमांक टीव्ही युनिट व पैठणी प्राजक्ता प्रज्योत शिंदे, चतुर्थ क्रमांक ड्रेसिंग टेबल व पैठणी छाया धनंजय शेलार, पाचवे बक्षीस 4 फुटी स्टडी कपाट व पैठणी भाग्यश्री अमित पवार, सहावे बक्षीस 3 फुटी स्टडी कपाट सोनाली अमोल चव्हाण, सातवे बक्षीस कॉम्प्युटर टेबल वर्षा सुनील हदगल, आठवे बक्षीस टीपॉय कोमल प्रवीण शिंदे , नऊवे बक्षीस लता विकास फुले चार खुर्ची सेट, दहावे बक्षीस देवघर श्वेता विवेक मोरे व अकरावे बक्षीस सिलिंग फॅन धनश्री दत्तकुमार फुले यांनी पटकावले.

या कार्यक्रमासाठी आझाद तरुण मंडळा तर्फे सोफा सेट, विद्या मिथुन बारवकर व सोनाली निलेश वाघ सिंगल कपाट, स्नेहल रणजीत भगत टीव्ही युनिट,विद्या विजय शिंदे ड्रेसिंग टेबल, साक्षी निलेश साबळे चार फुटी स्टडी कपाट, पूजा संजय शिंदे तीन फुटी स्टडी कपाट, अनुराधा अंकुश जगताप कॉम्प्युटर टेबल ,सुनिता धनंजय गाडे टी पॉय,विद्या अनिल गुप्ते चार खुर्ची सेट , सौभाग्य ब्युटी पार्लरच्या प्रो.प्रा प्रीती अक्षय राजेशिर्के देवघर, मोरे स्टील अँड फर्निचर सिलिंग फॅन, श्रीधा प्रोफेशनल ब्युटी सलून अँड लेडीज शॉपी प्रो.प्रा तेजस्विनी अजित यादव व जगदाळे मेडिकलचा प्रो.प्रा कोमल सिद्धार्थ जगदाळे उत्तेजनार्थ 100 आकर्षक बक्षिसे, कै.सौ.सुशीला जयसिंग चव्हाण यांचे स्मरणार्थ सुशीला इलेक्ट्रिकल्स प्रो.प्रा सुप्रिया धैर्यशील (वैभव) चव्हाण प्रश्नमंजुषा 100 आकर्षक बक्षिसे, लहान मुलांसाठी खास बक्षीसे तेजस्वी औदुंबर निंबाळकर ,शांताई टेक्सटाइल्स फलटण प्रो.प्रा. अतुल सुभाष निंबाळकर यांच्या वतीने पहिल्या पाच क्रमांकांना पैठणी अशी एकूण 300 वेगळी बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या टी.ए.टी परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यात 21 वा व तर इंदापूर तालुक्यात 1 ला क्रमांक मिळवणाऱ्या आशा स्वप्नील शिंदे यांची जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल तसेच मंडळाला विशेष सहकार्य करणारे राजाराम बापू रायते व सणसर सोसायटीचे संचालक सोमनाथ उर्फ पिंटू गुप्ते यांचा सत्कार करण्यात आला.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले. याप्रसंगी राजाराम बापू रायते सणसर सोसायटी संचालक सोमनाथ उर्फ पिंटू गुप्ते, भैरवनाथ यात्रा कमिटीचे खजिनदार मिथुन बारवकर , विजया निंबाळकर, तेजस्वी निंबाळकर, सुप्रिया चव्हाण, तेजस्विनी यादव, कोमल जगदाळे, विद्या गुप्ते, सुनिता गाडे, प्रीती राजेशिर्के, अनुराधा जगताप, साक्षी साबळे, पूजा शिंदे, विद्या शिंदे, सोनाली वाघ, विद्या बारवकर, रणजीत भगत, तिरुपती लॅबरोटरी व हिंदवी फार्माचे गणेश रायते, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शिंदे,अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष वरद गुप्ते, स्वप्निल शिंदे, विजय शिंदे, अजित शिंदे, अक्षय शिर्के, योगीराज गाडे, निलेश साबळे, अमीर पानसरे, निखिल कोकाटे, गणेश जाधव, आकाश कांगळे,आनंद गाडे, स्वानंद गाडे, प्रवीण शिंदे, सिद्धार्थ जगदाळे, औदुंबर निंबाळकर, वैभव चव्हाण, निलेश वाघ, अजित यादव, चैतन्य शिंदे ,समीर भोईटे, विक्रम वाघ, महेश जगताप, निखिल माने,सिकंदर शेख, राघव शिर्के, समर्थ भाग्यवंत, राजगुरू भाग्यवंत व अनेक ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते. विजय शिंदे,अक्षय शिर्के, योगीराज गाडे, निलेश साबळे, अमीर पानसरे, निखिल कोकाटे, गणेश जाधव, आकाश कांगळे, आनंद गाडे, स्वानंद गाडे, प्रवीण शिंदे, सिद्धार्थ जगदाळे, औदुंबर निंबाळकर, वैभव चव्हाण, निलेश वाघ, अजित यादव, चैतन्य शिंदे ,समीर भोईटे, विक्रम वाघ, महेश जगताप, निखिल माने,सिकंदर शेख, राघव शिर्के, समर्थ भाग्यवंत, राजगुरू भाग्यवंत व अनेक ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.

वै.ह.भ.प.गणपत बुवा काळे महाराज यांचे शुभ हस्ते श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा झालेल्या व गेली 50 वर्षे हून अधिक काळ सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तसेच सांस्कृतिक संचनालय महाराष्ट्र शासन व वालचंदनगर पोलीस स्टेशनचा सहा वेळा प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या आझाद तरुण मंडळाच्या श्री गणेशोत्सव सन 2026 च्या कार्यक्रमांतर्गत भजन, अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप, परिसर स्वच्छता, परिसरातील निर्मल्याचे संकलन, शालेय विद्यार्थ्यांसाठी चमचा लिंबू व संगीत खुर्ची स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पर्यावरण पूरक गौरी सजावट स्पर्धा,डान्स स्पर्धा, आदर्श माता सत्कार, वृक्षारोपण, महिलांना श्री गणेशाच्या आरतीचा मान, महिलांसाठी होम मिनिस्टर, अमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती पर कार्यक्रम, टाळ मृदंगाच्या साथीने राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक संदेश देत पालखीतून डीजे ,गुलाल विरहित विसर्जन मिरवणूक, इत्यादी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


