फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०२ ऑक्टोबर २०२६):- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी अॅन्ड रिसर्च सेंटर, ठाकूरकी, फलटण येथे डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. एच.एन. मोरे, प्राचार्य, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर व श्री. राहुल फाळके, Site Head Cipla Ltd, Kurkumbh यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रम देशमुख यांनी दिली.
सदर स्पर्धेस विविध फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित राहणार असून या स्पर्धेसाठी राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्हयांतील सुमारे ५५ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आतापर्यत आपला सहभाग नोंदवला आहे.

ही स्पर्धा डिप्लोमा व डिग्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी असून प्रत्येकी तीन विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
आधुनिक फार्मसी क्षेत्रात ग्रामीण भागातील फार्मासिस्ट विद्यार्थी कसा यशस्वी होऊ शकतो याचे मार्गदर्शन तसेच विविध फार्मसी विषयांच्या पोस्टरचे सादरीकरण महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी करतील स्पर्धेच्या आयोजनाचा मुळ हेतू हा विद्यार्थ्याचा संशोधनात्मक दृष्टीकोण वाढीस लागणे तसेच कृत्रिम बुध्दीमत्तेचा औषध निर्माण क्षेत्रातील उपयोग, औषध निर्माण व औषध विक्रीचे व्यवसाय सध्याच्या स्पर्धात्मक युगात कसे यशस्वी होतील या संदर्भातील मार्गदर्शन व विद्यार्थ्यानी आधुनिकतेची कास धरण्यासाठी एक अत्याधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, सदर स्पर्धेच्या माध्यमातून सक्षम फार्मासिस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य (College Development Committee), महाविद्यालय नियामक मंडळ सदस्य (Governing Body), प्रशासन अधिकारी प्राचार्य श्री. अरविंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


