फलटण टुडे वृत्तसेवा (पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२६):-: भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून ओम प्रकाश बकोरिया (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली- उगले यांनी दिली आहे.
श्री. बकोरिया यांचा निवासाचा पत्ता ‘सिंहगड’, व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, बंडगार्डन पुणे असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ९१८५१०३३९३ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे सकाळी सकाळी १० ते ११ वा. या कालावधीत भेटता येईल. तसेच नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मनोज ठाकरे हे असून त्यांचा संपर्क क्र. ९९६०९९५०६२ असा आहे, असेही निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

