फलटण बाजार समितीत कांद्याची १५०० हून अधिक पोत्यांची आवक; प्रतिक्विंटल ५ हजार १ रुपयांपर्यंत उच्चांकी दर

फलटण: टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १३ ऑक्टोबर २०२६):-
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात कांद्याचे दर तेजीत असल्याचे पाहायला मिळत असून, मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटल ५,००१ रुपयांपर्यंतचा कमाल दर मिळाला आहे. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या लिलावातील कांदा बाजारभाव बाजार समिती प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत.
मंगळवारी पार पडलेल्या बाजारात कांद्याची जोरदार आवक झाली. दिवसभरात एकूण ७५७ क्विंटल म्हणजेच १,५१४ कांदा पिशव्यांची (पोती) आवक नोंदवली गेली. या लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल किमान २,००० रुपये तर सरासरी ३,३०० रुपये असा दर मिळाला. तसेच प्रतवारीनुसार चांगल्या प्रतीच्या कांद्याला ५,००१ रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला आहे.
मार्केट यार्ड फलटण येथे कांद्याचे भाव तेजीत असल्याने आणि योग्य दर मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!