शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन…

सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे दि १३ ऑक्टोबर २०२६):-
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांसाठी प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांतील उल्लेखनीय कामगिरीसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

शासनाच्या २९ डिसेंबर २०२३ व २५ जानेवारी २०२४ रोजीच्या निर्णयांनुसार निश्चित करण्यात आलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली, २०२३ नुसार ही अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ५९ सेकंदांपर्यं केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!