फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १८ ऑक्टोबर २०२६):-
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील मुख्य बाजारात रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या धान्य आणि कडधान्यांच्या लिलावाचे घाऊक बाजारभाव आणि आवक जाहीर करण्यात आली आहे.
घाऊक बाजारातील विविध शेतमालाचे दर आणि आवक (प्रति क्विंटल रुपये) खालीलप्रमाणे राहिली:
ज्वारीची ५० क्विंटल आवक झाली असून तिला प्रति क्विंटल ४,००० ते १०,१० मी दर मिळाला. बाजरीची २६० क्विंटल आवक झाली असून दर ३,००० ते ४,७५१ रुपये राहिला. गव्हाची २७४ क्विंटल आवक झाली असून भाव २,७०० ते ४,२७५ रुपये नोंदवला गेला. हरभऱ्याची ५७ क्विंटल आवक झाली असून दर ७,००० ते ८,००० रुपये मिळाला. मक्याची सर्वाधिक ३१२ क्विंटल आवक झाली असून भाव २,७०० ते ३,२०० रुपये प्रति क्विंटल राहिला.
कडधान्य आणि इतर धान्यांमध्ये खपलीची ८ क्विंटल आवक झाली असून दर ५,२०० ते ६,७०० रुपये राहिला. उडदाची ३५ क्विंटल आवक झाली असून भाव ९,५०० ते १०,००० रुपये नोंदवला गेला. हिरव्या मुगाची १३ क्विंटल आवक झाली असून त्याला ९,५०० ते १०,५०० रुपये दर मिळाला, तर पिवळ्या मुगाचा भाव १७,००० रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला. याशिवाय घेवड्याची ४२ क्विंटल आवक झाली असून त्याला ७,५०० ते १०,००० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण: रविवारचे धान्य व कडधान्यांचे घाऊक बाजारभाव जाहीर; मुगाला मिळाला चांगला दर
