मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नवरात्र महाभोंडला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा..


मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या भोंडला प्रसंगी विद्यार्थीनी व शिक्षिका

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १९ ऑक्टोबर २०२६):-
फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी नवरात्र भोंडला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रशालेच्या ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक विजय पाटील ,माध्यमिक विभागाच्या शिक्षक प्रतिनिधी सौ लतिका अनपट उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने हत्तीपूजन, प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सांस्कृतिक विभागा च्या कु तृप्ती शिंदे व त्यांच्या सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी पारंपरिक भोंडला व देवीची गीते सादर केली. विद्यार्थिनींनी आकर्षक गरबा नृत्य सादर केले. या नृत्यामध्ये विद्यार्थिनींसह प्रशालेतील महिलावर्ग यांनी आनंदाने सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले.


पारंपरिक अश्या आपल्या संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवातून विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, संस्कृती आणि सणांचे महत्त्व अनुभवता आले. उत्सवाची सांगता पारंपरिक ‘आडबाई आडोनी ‘ या भोंडला गीताने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ वैशाली रसाळ यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!