मान्यवर व प्रायोजक यांचा सत्कार करताना विद्यार्थी
गायन, नृत्य,रॅम्प वॉकिंग च्या माध्यमातून कला,गुण यांना प्रोत्साहन
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २७ ऑक्टोबर २०२६ ):-
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनीरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामती येथील विद्यार्थ्यांच्या वतीने फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे विश्वस्त व तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व अजितदादा नी विद्यार्थ्यां साठी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
या प्रसंगी अभियांत्रिकी कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. अनिल डीसले एच.ओ.डी.(FY.A) ,प्रा.साै.अपर्णा सज्जन मॅम एच.ओ.डी.(FY.B), प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.केशव जाधव, प्रा.साै.गौरी भोईटे, प्रा.रोहित तरडे
आणि प्रायोजक पाटील बिर्याणी चे अक्षय खलाटे, बनकर वडेवाले, इक्वल युनिसेक्स सलून, नाद सिलेक्शन अँड मेन्स वेअर आदी मान्यवर उपस्तीत होते.
रॅम्प वॉक मध्ये – नेहा गोडसे, निशांत रनवरे
नृत्य मध्ये – सानिका शहा , कादंबरी पाटील व दीपाली कराडखेले
व गायन मध्ये – नेहा गोडसे
यांनी यश मिळवले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार शिंदे, सार्थक मणियार, सागर शिंदे,
व सर्व सेकंड इयर ए आय डी एस टीम आदी विद्यार्थ्यांनि परिश्रम घेतले .
विद्यार्थी जीवनात आत्मविश्वास वाढावा, स्टेज डेअरिंग वाढावी व नेतृत्व गुण विकसीत व्हावे व विविध शाखेतील विद्यार्थ्यांच्या ओळख च्या माध्यमातून कला, गुणांना वाव मिळावा म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे
प्रमुख आयोजक ओंकार शिंदे यांनी सांगितले.
