रियल व फॉरचून डेअरीमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस

दिवाळी बोनस जाहीर केल्यावर कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी चेअरमन मनोज तुपे व इतर

कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देऊन व्यवस्थापनाकडून दिवाळीची अनोखी भेट

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २८ ऑक्टोबर २०२६):-
दिवाळीच्या सणानिमित्त बारामती येथील रियल डेअरी व इंदापूर येथील फॉरचून डेअरी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देऊन आनंदाची पर्वणी दिली आहे..
पगाराच्या ५० ते ६०% इतका दिवाळी बोनस जवळपास ५०० कामगारांना देण्यात आला आहे.
या प्रसंगी रियल डेअरी व फॉरचून डेअरी चे चेअरमन मनोज तुपे, कार्यकारी संचालिका अनिता तुपे, कंपनी प्रेसिडेंट प्रशांत अपारजित,जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर खरमाटे, एच .आर .मॅनेजर सुशांत शिर्के, फायनान्स मॅनेजर प्रीतम पारखे, दूध संकलन अधिकारी प्रवीण तावरे, कॉलिटी कंट्रोल अधिकारी पंकज पानसरे, सप्लाय चेन व्यवस्थापक धुंडीराज देव व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्तीत होते.


गुणवत्ता व दर्जात्मक काम करताना प्रशासनाने योग्य मूल्यमापन करून बोनस दिल्याने दिवाळी गोड होणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कर्मचारी व अधिकारी यांनी एकत्रित कंपनीच्या प्रगतीमध्ये सातत्य पूर्वक प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या प्रति असलेले प्रेम व सर्व कर्मचारी व अधिकारी बारामती ,इंदापूर व परिसरातील शेतकऱ्यांचे मुले आहेत दुष्काळी परिस्थिती मध्ये त्यांची दिवाळी गोड व्याहवी म्हणून आर्थिक काटकसर करून सदर बोनस देत आहोत म्हणजेच शेतकऱ्यांना व मुलांना न्याय देत असल्याचे चेअरमन मनोज तुपे यांनी सांगितले.
आभार व्यवस्थापकीय संचालिका अनिताताई तुपे यांनी मांडले


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!