विजयनगर युवा प्रतिष्ठानने साकारलेले अन्नातील भेसळ व दुधातील भेसळ यावर आधारित देखावा
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २१ सप्टेंबर २०२६ ):-
गणेशोत्सवानिमित्त विजयनगर युवा प्रतिष्ठान, बारामती यांच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त “अन्न हे पूर्णब्रह्म” या विषयावर आधारित सामाजिक प्रबोधनात्मक देखावा साकारण्यात येत आहे.
अन्नसुरक्षा, अन्नातील भेसळ,दुधातील भेसळ, पारंपरिक अन्नसंस्कृती, देशी बियाणे, शेती, आधुनिक विज्ञान आणि जागरूक ग्राहक या विषयांवर नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे,

रसायन मुक्त शेती व नागरीकांचे उत्तम आरोग्य रहावे व प्रत्येक भारतीय नागरिक कॅन्सर पासून मुक्त व्हावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे
विजयनगर युवा प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले.
गणेशोत्सव हा सामाजिक दृष्ट्या सादर करत असताना त्या माध्यमातून नागरिकांमध्ये मोठ्या संख्येने जनजागृती करण्याचे हे साधन आहे त्यामुळे आम्ही स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारातून सामाजिक उपक्रम यापूर्वी राबवले आता नागरिकांच्या आरोग्याबाबत यावर्षीपासून उपक्रम राबवणार असल्याचेही सांगण्यात आले

या प्रसंगीविजयनगर युवा प्रतिष्ठानचे मानस उगले, पियूष कोठारी, रत्नेश बंडगर, हेमल शहा, प्रथमेश टंकसाळे, भावेश धनवानी, शुभम कोठारी, दुष्यंत तुपे, शुभम बंडगर, मंगेश साळुंखे, उल्हास कोरे, हर्षद साळुंखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


