बिरजू मांढरे यांच्या वतीने सलग १५ वा पालखी सोहळा संपन्न

साईबाबा पालखी सोहळा शुभारंभ प्रसंगी सचिन सातव , बिरजू मांढरे व इतर मान्यवर (छायाचित्र : प्रशांत कुचेकर)

नाथपंथिय, वारकरी संपद्रय व शेकडो साई भक्तांच्या उपस्तीत शिर्डीकडे पालखी चे प्रस्थान

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि ११ नोव्हेंबर २०२६):-
श्रद्धा,सबुरी आणि सबका मलिक एक हे या साईबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करीत, व्यसन मुक्ती ,वृक्षारोपण,रक्तदान शिबिर च्या माध्यमातून सलग १५ वर्षे बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा काढून सातत्य ठेवून असंख्य साई भक्त जोडणारे बारामती नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे यांचा साई पालखी सोहळ्यास गुरुवार दि.१२ नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला.


बारामती चे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या शुभहस्ते साई आरती करून प्रस्थान करण्यात आले या प्रसंगी नगरसेवक अमोल कावळे, अमर धुमाळ, सोमनाथ गजाकस,गणेश जोजारे व सूरज सातव , यादगार फौंडेशन चे फिरोज बागवान, शक्तिपात महायोग साधनधाम ट्रस्टचे स्वामी श्रीपातीर्थ महाराज,नाथपंथीय जैनकवाडी ट्रस्ट चे सूरज महाराज थोरात व संतोष आटोळे, संतोष सातव , सतीश खुडे , प्रमोद डिंबळे,धनंजय तेलंगे, शिर्डी चे पै. मदन मोकाटे, रामभाऊ सोनवणे, अनिल आलवणे, बाबूशेठ , तानाजी सोनवणे, अजित सोनवणे, भिवा तांबे, गणेश घोडे, सागर सोनवणे व चांडाळ चौकटी च्या करामती चे अभिनेते भरत शिंदे, रामभाऊ जगताप, सुभाष मदने
व इतर मान्यवर उपस्तीत होते.


साई बाबांच्या विचारांचा आदर करत डॉ आंबेडकर वसाहत उभारणी व इतर
समाजउपयोगी कार्य केल्याने खरे साई सेवक असल्याचे बिरजू मांढरे यांनी दाखवून दिल्याचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, व्यसन मुक्ती,डॉ आंबेडकर वसाहत मधील नागरिकांना विविध मदत केल्यानेच बिरजू मांढरे साई विचारांचे पाईक असल्याचे नाथपंथीय सूरज महाराज थोरात यांनी सांगितले.
बारामती च्या अध्यात्मिक इतिहासात नोंद घ्यावी असा पायी पालखी सोहळा घेण्याचे श्रेय यांना जात असल्याचे स्वामी श्रीपाततीर्थ महाराज यांनी सांगितले.


अध्यात्म व विज्ञान च्या माध्यमातून साईबाबा चे विचार पालखी सोहळा मधून पसरवले जात असल्याचे ह.भ. पा कपिल महाराज चव्हाण यांनी सांगितले.
सर्व धर्म ,जात,पंथ यातील सर्वांना एकत्र करून अध्यात्मिक आनंद व संतुष्टता देण्याचे काम बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळा मध्ये होत असल्याचे प्रास्ताविक मध्ये बिरजू मांढरे यांनी सांगितले.
साईच्छा सेवा ट्रस्ट, बीएम ग्रुप,वस्ताद लहुजी साळवे दहीहंडी मंडळ, कै भाऊसाहेब मांढरे मित्र परिवार,श्रीहरी भाऊ तेलंगे मंडळ, जय भवानी मित्र मंडळ यांनी उपस्तितांचे स्वागत केले तर सुत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले व आभार राजू मांढरे यांनी मानले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!