भाजपच्या ३० ते ३५ मते फोडल्याच्या दाव्याला शिवसेनेचे प्रत्युत्तर; ८२ विरुद्ध ४९ ठरावांचा दाखला देत राजे गटाचा कमबॅकचा दावा!

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ६ नोव्हेंबर २०२६):-
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. फलटण तालुका सोसायटी मतदारसंघातून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ७१ मते मिळवत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा ११ मतांनी पराभव केला. या निकालानंतर भाजपकडून विरोधकांची ३० ते ३५ मते मिळवण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र भाजपचा हा दावा धांदात खोटा असल्याचे शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,

शिवसेनेची मोठ्या प्रमाणावर मते फुटल्याची चर्चा निराधार असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. तसेच विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि डीसीसी बँकेच्या निकालांचा दाखला देत फलटणमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून राजे गटाचे राजकीय कमबॅक झाल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
शिवसेनेने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, फलटण तालुका सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे मूळचे ८२ ठराव होते. हे ठराव त्यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

तर भाजप, रासप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर छोट्या-मोठ्या गटांचे मिळून ४९ ठराव होते. त्यामुळे .
शिवसेनेची ३० ते ३५ मते फुटल्याचा भाजपचा दावा वस्तुस्थितीला धरुन नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. अपेक्षित मतांपैकी काही मते निश्चितपणे कमी पडली असली तरी मोठ्या प्रमाणावर मतदान फुटल्याची चर्चा चुकीची असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
जी काही मते फुटले आहेत ती
मतदारांवर दबाव आणि सत्तेच्या गैरवापराचा आरोप
डी.सी.सी.बँकेच्या निवडणुकीदरम्यान आपल्या काही मतदारांवर मोठ्या प्रमाणावर दबाव आणण्यात आला. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेच्या ४ मतदारांवर त्यांच्याच नातेवाईकांकडून अपहरणाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, संबंधित मतदार दबावाला बळी पडले नाहीत, असा दावाही करण्यात आला आहे. निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करुन काही मतदारांना प्रभावित करण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालातून शिवसेना राजे गटाच्या वाढत्या ताकदीचा दावा विधानसभा आणि फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना राजे गटाने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कमबॅक केल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ८ पैकी ५ जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले. तर पंचायत समिती निवडणुकीत १६ पैकी ८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्याचा दाखला देण्यात आला आहे.
या निकालांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्तेचा गैरवापर करुन सत्ता स्थापन करण्यात आल्याचा आरोपही प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आला आहे.


भाजपचे काही नेते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यात चुकीच्या पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत तालुक्यातील जनता या घडामोडी उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडावा यासाठी विरोधकांकडून वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात आले, तसेच कारखान्याच्या कामकाजात अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. मात्र या सर्व अडचणींवर मात करत विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करण्यात यश आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स खरेदी करुन कारखाना आणि राजे गटावरील आपला विश्वास व्यक्त केल्याचाही दावा करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत राजे गटावर १७ हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमधील मतांची बेरीज विचारात घेतल्यास भाजपपेक्षा शिवसेनेने सर्वाधिक मते मिळविल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असून राजे गटाने शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्या रुपाने २ संचालक निवडून आल्याने राजे गटाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर डी.सी.सी.बँकेतील यशामुळे राजे गटाचा आत्मविश्वास अधिक बळावला असून आगामी राजकीय वाटचालीसाठी हा विजय महत्त्वाचा ठरणार असल्याचे संकेत या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आले आहेत.
एकूणच, डीसीसी बँकेच्या निवडणुकीतील ७१ विरुद्ध ६० या निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात मतांच्या गणितावररुन सुरु झालेला वाद आता राजकीय प्रतिष्ठेच्या संघर्षात रूपांतरित होताना दिसत आहे. भाजपकडून विरोधकांची मते मिळवल्याचा दावा केला जात असताना शिवसेनेने ठरावांची आकडेवारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आणि श्रीराम कारखान्याच्या हंगामाचा दाखला देत राजे गटाच्या माध्यमातून शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर फलटण तालुक्यात कमबॅक केल्याचे दिसून येत आहे. असेही शेवटी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!