जिजाऊ सेवा संघाच्या वतीने जिजाऊ नारी सन्मान पुरस्कार प्रसंगी उपस्तीत मान्यवर व महिला प्रतिनिधी
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ७ नोव्हेंबर २०२६):-
बारामती शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने ‘जिजाऊ नारी पुरस्कार देऊन ‘ सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बारामती नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री सातव,वाल्हेकर जेवलर्स च्या संचालिका सारिका चेतन शहा वाल्हेकर आणि निमिष चेतन शहा व उपनगराध्यक्ष, नगरसेविका, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी,विविध संस्था, महाराष्ट्र राज्य शासनाचे बचत गट संचालक महेश हराळ,पंचायत समिती पदाधिकारी व विविध बचत गट महिला प्रतिनिधी उपस्तीत होते.
या प्रसंगी वनिता बनकर ,सुनिता शहा, सविता जाधव, श्वेता नाळे योगिनी मुळे, अर्चना सातव , वृषाली निकम, यांनी स्वतःच्या क्षेत्रातील अनुभव कथन केले

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला ,क्रीडा, सहकार ,औद्योगिक, कृषी ,आदी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांनी जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर सर्वसामान्य परिस्थिती असताना संघर्ष करत कधी मुलांना घडविले तर कधी पतींना साथ देऊन व्यवसायात यश मिळवले तर कधी अपंगत्व आले असताना यश मिळवले तर कधी स्वतः नोकरी, व्यवसायात यश मिळवले आशा महिलांचा सन्मान बारामती तालूका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ यांच्या वतीने’ जिजाऊ नारी सन्मान ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी सांगितले.

पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात महिला काम करत असतात ,सदर सन्मान महिलांचा आत्मविश्वास वाढला त्यांच्या कार्यास शाबासकी मिळाली असल्याचे वाल्हेकर जेवलर्स च्या संचालिका सारिका चेतन शहा वाल्हेकर यांनी सांगितले.
मनीषा शिंदे,सुनंदा जगताप, संगीता साळुंखे, कल्पना माने, मनीषा खेडेकर, ऋतुजा नलवडे, गौरी पाटील, पूजा खलाटे, विना यादव, सुवर्णा केसकर, वंदना जाधव, अमृता सूर्यवंशी, छाया पाटील,ऐश्वर्या बागल आदी जिजाऊ सेवा संघाच्या महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले तर आभार मनीषा शिंदे यांनी मानले

