डॉ. वंदना वाहुळ यांचा सन्मान करताना लडकत स्कुल ऑफ फौंडेशन चे पदाधिकारी
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, ला शिक्षण उपसंचालकांची भेट!
फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २० नोव्हेंबर २०२६):-
सुजान भारतीय नागरिक होण्यासाठी व भारताचे नाव जगामध्ये उज्वल होणारी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असते व या साठी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगी विकास होणे महत्त्वाचे व गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण उपसंचालिका डॉ. वंदना वाहुळ यांनी केले.


गुरुवार १९ नोव्हेंबर रोजीलडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, बारामती या शाळेस डॉ.वंदना वाहुळ यांनी निवड वेतनश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी २०२६-२७ प्रशिक्षणाच्या निमित्ताने भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व उपस्तीत शिक्षक यांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नामदेव लडकत, सचिव गणेश लडकत, संचालिका शुभांगी लडकत , प्रियांका लडकत व शाळेचे प्राचार्य रामचंद्र वाघ व तानाजी गवळी आणि प्रशिक्षणासाठी निवड वेतनश्रेणीचे ११८ प्रशिक्षणार्थी व वरिष्ठ वेतनश्रेणीचे ९१ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते


प्रशिक्षणादरम्यान विविध शासकीय शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शिक्षकांना शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांच्या विविध शैक्षणिक समस्यांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यात आले.लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनने प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेल्या उत्कृष्ट सुविधा, तसेच शाळेच्या उत्कृष्ट शैक्षाणिक धोरण विद्यार्थी गुणवंता शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सोयीसुविधा व शाळेच्या व्यवस्थापनाचे डॉ. वंदना वाहुळ यांनी कौतुक केले
शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. नामदेव लडकत यांनी दिली
आभार सचिव गणेश लडकत यांनी मानले.

