फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा , (सुरेंद्र फाळके ) दि २० नोव्हेंबर २०२६):-
छत्रपती शाहू क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेचा होतकरू व गुणवंत खेळाडू चि. सर्वेश शिंदे याने उत्कृष्ट कौशल्य, अचूक नेमबाजी आणि जिद्दीच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

या उल्लेखनीय यशाच्या जोरावर सर्वेश याची आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण प्रशालेसाठी ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

सर्वेशच्या या यशामागे त्याची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा आहे.
त्याच्या या यशाबद्दल उत्तम एज्युकेशन सोसायटीचे सचिव व नवनिर्वाचित संचालक सातारा जिल्हा बँकेचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांनी विशेष कौतुक केले . तसेच प्राचार्य बी.डी काळे व उपप्राचार्य पुनम कदम उपमुख्याध्यापक राजेंद्र मा माडकर पर्यवेक्षक सि.टी कर्वे , श्री.मनोज कदम,यांनी सर्वेश शिंदे व त्याचे मार्गदर्शक श्री उत्तम घोरपडे यांचा अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



