तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मुधोजी हायस्कूलच्या सुवीर फडे याचा प्रथम क्रमांक; शैक्षणिक उपकरण विभागात घवघवीत यश

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. २७ नोव्हेंबर २०२६): फलटण येथे पार पडलेल्या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथील विद्यार्थी सुवीर सुदर्शन फडे याने लक्षवेधी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे झालेल्या या प्रदर्शनात त्याने ‘मोठा गट – शैक्षणिक उपकरण’ या विभागात बाजी मारून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि सादरीकरणातील अचूकतेच्या जोरावर सुवीर फडे याने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व प्रमाणपत्र मिळवले. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे मुधोजी हायस्कूलच्या शैक्षणिक व वैज्ञानिक परंपरेत आणखी एका मानदंडाची भर पडली आहे.

सुवीर फडे याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे व मार्गदर्शक I’m शिक्षक यांचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक, विजय लोंढे पाटील, पूजा पाटील, स्कूल कमिटीचे पदाधिकारी, विज्ञान विभाग प्रमुख आर एम पवार तसेच शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!