जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिंडवस्ती येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा


फलटण दि. ८ :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिंडवस्ती येथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धा, शाळेतील विदयार्थिनीनी भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या साकारलेल्या वेशभूषा व त्यांचे कार्य यांचे केलेले सादरीकरण, तसेच संगीत खुर्ची इ.कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण तालुक्याच्या नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी मा.श्रीम.पठाण मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी साठे गावचे माजी सरपंच सौ.प्रतिभाताई मिंड मॉडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सदस्या, गावातील महिला भगिनी उपस्थित होते
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.निवेदिता भुषण शिंदे, द्वितीय क्रमांक सौ.स्विटी सुर्यकांत माने, तृतीय क्रमांक सौ.निलम मिलन खांडेकर यांनी संपादन केला तर संगित खुर्ची स्पर्धैत प्रथम क्रमांक सौ.उषा विकास काकडे, द्वितीय क्रमांक सौ.शकुंतला दुष्यंत खांडेकर, तृतीय क्रमांक वर्षा सदाशिव खांडेकर यांनी संपादन केला.विजयी स्पर्धकांचे श्रीम.पठाण मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती फलटण यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले
*त्याचप्रमाणे शाळेतील २४ विद्यार्थीनींनी भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या साकारलेल्या वेशभूषेतुन त्यांचे कार्य आपल्या वक्तुत्वातुन सादर केले.यामध्ये राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले,रमामाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, बहिणाबाई चौधरी,लता मंगेशकर, सानिया मिर्झा,पी.टी.उषा, सुनिता विल्यम्स,मेरीकोम, कल्पना चावला, ललिता बाबर, कविता राऊत, रूपाली चव्हाण,किरण बेदी,बचिंद्र पाल,शीला डावरे,अरूनिमा सिन्हा, इत्यादी कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा विद्यार्थीनींनी. आपल्या वक्तुत्वातुन सादर केली
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम.पठाण मॅडम यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी महिलांचे व भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या साकारलेल्या वेशभूषेतुन सहभागी विद्यार्थीनिंचे कौतुक करून शाळेमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शाळेस राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणेचे आश्वासन दिले
कार्यक्रमास मिंडवस्ती शाळेतील महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.सुत्रसंचलन राजेश बोराटे व सौ.शकुंतला पवार यांनी केले.आभार उषा काकडे यांनी मांडले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!