कोरोना पार्श्वभूमीवर राजाळे ता. फलटण येथील ग्रामदैवत जानाई देवीची यात्रा यावर्षी रद्द

फलटण दि.२ :- 
 फलटण तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजाळे ता.फलटण गावचे ग्रामदैवत श्री जानाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती सरपंच तथा अध्यक्ष ग्रामदक्षता कमिटी राजाळे यांनी दिली आहे.

श्री जानाई देवीची वार्षिंक यात्रा रविवार दि.२ मे व सोमवार दि.३ मे रोजी आहे. या वर्षी पुन्हा ‘कोरोना’ महामारिच्या संकटामुळे श्री जानाई मंदीर व इतर सर्व मंदिरे देखील बंद राहणार असून भाविकांची सर्वानी घरुनच पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून दर्शन घ्यावे. स्थानिक भाविकांचे नातेवाईक नेहमीप्रमाणे दर्शनास गावात येणार असतील तर, त्यांना कॉल करून येण्यास मज्जाव करावा.

राजाळे गावामध्ये बाहेरील वाहने व माणसे येणार नाहीत तसेच मंदिरात कोणी ग्रामस्थ दर्शनास जाणार नाहीत यावर निगराणी करून कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करनेत आले आहेत. देवाच्या काठ्यांचे घरीच पूजन करून तेथेच विसर्जन करावे.गावात व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले असून,कोणी एकञ येऊन जमाव केल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केलेस त्याचेविरूध्द पोलीस कारवाई व दंडात्मक कारवाई होईल याची नोंद घेऊन आपल्याकडून जिल्हादंडाधिकारी यांचेकडून ‘कोवीड १९’ साठी आपत्ती कायदा २००५ अंतर्गत आदेशित केलेल्या कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व ग्रामस्थांनी दक्षता घेऊन जिल्हा प्रशासनास व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन सरपंच तथा अध्यक्ष ग्रामदक्षता कमिटी राजाळे यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!