राजाळे येथे कृषि विभाग व जगदंबा कृषि सेवा केंद्र व पल्लवी मेडिकल यांच्या संयुक्त विध्यमाने पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना मका पिकांवरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण माहिती पत्रक आणि मास्क व सँनिटायजर वाटप

फलटण : कोरोना या महारामरी रोगाचा सामना व त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मास्क व सँनिटायजर हे महत्वाचे ढाल आहे शेतातून प्रत्यक्षअन्नधान्य पीकवणाऱ्या शेतकऱ्यांनासाठी खूप महत्वाचे म्हणून मास्क व सँनिटायजर तसेच मका पिकाकरील लष्करी अळी नियंत्रण माहिती पत्रक चे वाटप कृषि विभाग व जगदंबा कृषि सेवा केंद्र व पल्लवी मेडिकल यांच्या वतीने पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील ३ ऑगस्ट जयंतीनिमित्त शेतीदिन कार्यक्रम दिनांक ३ऑगस्ट २०२० रोजी राजाळे ता फलटण जिल्हा सातारा येथील कार्यक्रमा चे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य सातारा सौ कांचनमाला निंबाळकर , सरपंच राजाळे मारुती मोहिते कृषि सहाय्यक राजाळे सचिन जाधव माजी सरपंच संभाजी निंबाळकर ,माजी सरपंच अशोक जगताप , तंटा मुक्त अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर ,पुरस्कार प्राप्त शेतकरी नीलकंठ धुमाळ, अमोल भोईटे पुरस्कार प्राप्त शेतकरी ,पोलीस पाटील महेश शेडगे ,प्रगतशील शेतकरी जयवंत निंबाळकर ,कमलाकर भोईटे कृषि मित्र , जगदंबा कृषि सेवा केंद्र प्रवीण जगताप मान्यवरांच्या हस्ते ५० शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले
श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक राजाळे यांची मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामा बाबत सत्कार राजाळे गावाच्या वतीने करण्यात आला

यावेळी सरपंच मारुती मोहिते,माजी सरपंच संभाजी निंबाळकर, पोलीस पाटील महेश शेडगे शेतीदिन आयोजन बाबत मनोगत व्यक्त केले
यावेळी कृषी विभागा मार्फत रबविण्यात येणारी विविध उपक्रम व योजना बाबत व अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण बाबत श्री कृषि सहाय्यक सचिन जाधव यांनी मार्गदर्शन केले

यावेळी नीलकंठ धुमाळ , जयवंतराव निंबाळकर या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
आभार कमलाकर भोईटे कृषि मित्र यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!