फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ७ जुलै २०२६):-
देवाला आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही पण डॉक्टर म्हणजेच परमेश्वराचे दुसरे रूप आहेत. डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वराचे च दुसरे कार्य आहे. तसेच शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांनी धान्य पिकवले तरच मानवास अन्न मिळते. सनदी लेखापाल म्हणजेच सी.ए .यांचेही समाजातील कार्य महान आहे असे प्रतिपादन इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेजर श्री प्रवेश जैन यांनी केले.
जैन सोशल ग्रुप फलटण व लायन्स क्लब फलटण वेलनेस वाॅरिअर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर्स डे, सी.ए.डे व कृषी दिन कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब उप प्रांतपाल श्री मंगेश दोशी उपस्थित होते. यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री .श्रीपाल जैन, लायन्स क्लब फलटण वेलनेस वाॅरिअर्स ग्रुपचे अध्यक्ष श्री.राजेंद्र कोठारी, सचिव स्वप्नील शहा, संचालक सौरभ दोशी व पदाधिकारी, जैन सोशल ग्रुप सचिव सौ.निना कोठारी ,संचालक डॉ. मिलिंद दोशी, सौ.अपर्णा जैन,तसेच बहुतांश जैन सोशल ग्रुप व लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.
यावेळी सर्वश्री डॉक्टर मिलिंद दोशी, निनाद दोशी, ऋषिकेश राजवैद्य, गुंजन गांधी, निखिल गांधी, आलोक गांधी,सौ. गौतमी गांधी तसेच C.A.श्री. मोनार्क दोशी व कृषी दिना निमित्त प्रगतिशील शेतकरी श्री. महावीर दोशी(गुणवरेकर),श्री.मंगेश दोशी (गुणवरेकर) यांचा श्री. प्रवेश जैन व श्री. मंगेश दोशी यांच्या शुभ हस्ते व पदाधिकारी यांचे हस्ते शाल ,श्रीफळ व मोतीमाळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.श्री. प्रवेश जैन यांच्या तर्फे पण भेटवस्तू देण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री मंगेश दोशी यांनी सर्व सत्कार मूर्तींना शुभेच्छा देऊन भविष्यात लायन्स क्लब व श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर संस्था यांच्या वतीने धर्मार्थ दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्षपकराज प.पु. वर्धमान सागर महाराजांच्या स्तुतीने सुकरण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मंगेश दोशी, श्रीपाल जैन, राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीप्ती राज वैद्य यांनी केले.आभार प्रदर्शन श्री. सौरभ जोशी यांनी केले.

