स्पर्धेचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष सचिन सातव व सोबत उपस्थित मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती, दि ७ जुलै २०२६):-
वीर सावरकर स्विमर्स क्लब तर्फे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
त्यामध्ये १६० स्पर्धक सहभागी झाले होते पुणे मुंबई रत्नागिरी सोलापूर या ठिकाणाहून स्पर्धक स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचा शुभारंभ बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केला. या प्रसंगी
पंकज भुसे मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद बारामती किरण इंगळे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नगरसेविका सौ भारती विश्वास शेळके , किशोर माने गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती, क्रीडा अधिकारी महेश चावले, क्लबचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे, सचिव विश्वास नाना शेळके क्लबचे खजिनदार मिलिंद अत्रे, संचालक बाळासाहेब टाटिया, अनिल सातव, दीपक बनकर,
सल्लागार , राजेंद्र जाधव , महेंद्र ओसवाल इत्यादी उपस्थित होते
या प्रसंगी ९ वर्ष वयोगट ते ४० वर्ष वयोगट मधील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धा यशस्वीरित्य पार पाडण्यासाठी महेश साळुंखे , जमीर शेख, संतोष कुलकर्णी, इरफान तांबोळी, सत्यवान गायकवाड
यांनी मोलाचे सहकार्य केले सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले .

