तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलचा दमदार ठसा!

१४ वर्षांखालील मुलांच्या संघाने पटकाविले उपविजेतेपद

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २४ सप्टेंबर २०२६):-

बारामती तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुल, सावळ येथील १४ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकाविले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे ज्ञानसागर गुरुकुलच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

दोन दिवस चाललेल्या या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ज्ञानसागर गुरुकुलच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. पहिल्या दिवशी दिवसभर झालेल्या विविध सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत संघाने उपांत्य फेरीत (सेमी फायनल) प्रवेश निश्चित केला.

Screenshot

दुसर्‍या दिवशी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही संघाने शानदार खेळ करत विजय मिळविला आणि अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात खेळाडूंनी विजयासाठी शेवटपर्यंत जोरदार झुंज दिली. मात्र, अवघ्या ७ गुणांच्या फरकाने ज्ञानसागर गुरुकुलच्या संघाला विजेतेपदापासून दूर राहावे लागले आणि संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानले.

संघातील खेळाडूंनी दाखविलेली चिकाटी, सांघिक भावना, शिस्त, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्य यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा विभाग आणि प्रशिक्षकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!