फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि. ७ जुलै २०२६):-
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मा.आयुक्त डॉ. राजेश देशमुख साहेब, मा.सह-आयुक्त अंमलबजावणी व दक्षता श्री.पी.पी.सुर्वे साहेब, मा.विभागीय उपआयुक्त पुणे विभाग, श्री.सागर धोमकर साहेब, मा.अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे, श्री. अतुल कानडे साहेब व मा.उपअधीक्षक हडपसर श्री.कसरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करणेकामी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बारामती विभाग जि. पुणे या पथकाने गोपनीय माहितीनुसार माळेगाव हद्दीत माळेगाव – सांगवी रोडवर तावरे फार्म शेजारी शिवनगर, ता. बारामती, जि. पुणे येथे सायंकाळी १७:३० वा. एक संशयित लाल रंगाची चारचाकी हुंडाई I-20 (रजिस्टर क्र. MH 43 AB 0748) नंबर असलेली गाडी थांबवून व आरोपीच्या राहत्या घरात तपासणी केली असता, सदर वाहनामध्ये व घरामध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. यामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की (७५० मिली व १८० मिली), इम्पेरियल ब्लू व्हिस्की (७५० मिली व १८० मिली), मॅकडोवेल्स नंबर १ व्हिस्की (७५० मिली), मॅकडोवेल्स नंबर १ सेलिब्रेशन रम (७५० मिली) आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की (१८० मिली) अशा विविध विदेशी मद्याच्या ब्रँडचे एकूण १८ सीलबंद बॉक्स मिळून आले.
दारूबंदी गुन्ह्याचा हा मद्यसाठा, १ अँड्रॉइड मोबाईल व जप्त वाहनासह इतर मुद्देमाल एकूण किंमत रु. ५,१३,९६०/- (अक्षरी रुपये पाच लाख तेरा हजार नऊशे साठ) इतकी असून सदरच्या गुन्ह्यात आरोपी १. तुषार रविंद्र कोकर, रा. कोकरे वस्ती, पणदरे, ता. बारामती, जि. पुणे व २. संदीप विठ्ठल कासार, रा. स्वप्नपूर्ती सीएचएस, सेक्टर-३६, खारघर, नवी मुंबई या दोघांस अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. सदरचा मद्यसाठा हा गोवा बनावटीचा असून महाराष्ट्र राज्यात विक्रीस परवानगी नसताना बेकायदा वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा (गु.क्र.नं. ११७/२०२६) नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क, बारामती विभागाचे निरीक्षक संभाजी स. बर्गे, दुय्यम निरीक्षक श्री. सागर मा. साबळे, श्री. गिरीशकुमार बा. कर्चे, श्री. मनोज प. होलम, स.दु.नि श्री.जी.आर.जाधव व जवान सर्वश्री निखिल देवडे, सागर दुबळे, मनोज माहिते, अक्षय पवार पथकाने करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. गिरीशकुमार कर्चे हे करीत आहेत.

