फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि १६ जुलै २०२६):- गुरुवार दि. १६ जुलै २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाणे येथे पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून एकुण ०३ आरोपींविरूद्ध फलटण शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.२६३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१),६४(२) (के), ६४ (२) (एम), ७४,७५ (२), ३५१(२), ३५१(३) सह अपंग अधिकार अधिनियम २०१६ कलम ९२ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर तक्रारीनुसार आरोपींवर पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून यातील आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल झालेनंतर तत्काळ मा. पोलीस निरीक्षक श्री घनशाम बल्लाळ यांनी तपास पथकातील म. पोलीस उपनिरीक्षक श्रीमती विजयमाला गाजरे यांना व त्यांचे सोबत असणा-या पोलीस पथकातील अंमलदार यांना आरोपीचे शोधाबाबत व अटकेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या त्याप्रमाणे यातील संशयित आरोपी नामे संतोष आनंदराव होळकर वय ४५ वर्षे, संदिप आनंदराव होळकर वय ४२ वर्षे, दिपक लाला जाधव वय ४३ वर्षे सर्व रा. फलटण ता. फलटण यांचा बातमीदारामार्फत शोध घेऊन सदर तीनही आरोपींना एक तासाच्या आत शिताफीने पकडून नमुद गुन्हयात दि. १६/०७/२०२६ रोजी अटक करणेत आली असून अटक आरोपीस आज रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो, फलटण यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांची दि.२१/०७/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करणेत आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे या करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सो, सातारा मा.डॉ. श्रीमती वैशाली कडुकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा.मा.श्री. धन्यकुमार गोडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, फलटण उपविभाग फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री घनशाम बल्लाळ, सहायक पोलीस निरीक्षक मितू जगदाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती विजयमाला गाजरे, पोलीस अंमलदार संतोष कदम, संतोष नाळे, जितेंद्र टिके, यांनी पूर्ण केली आहे.

