फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १६ ऑगस्ट २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,फलटण. येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन व ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी श्रीमंत मुधोजीराजे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री अशोक जीवराज दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी ध्वजारोहन ऑर्डर प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. तुषार मोहिते यांनी दिली तर वंदे मातरम , राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, झेंडा गीत गायन सौ. विनिता लोणकर , नेरकर सर, आर्या साळुंखे व इतर विद्यार्थीनींनी सादर केले. तसेच मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे एन सी सी विभाग प्रमुख श्री. डी.जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी च्या कॅडेटनी यावेळी शपथ घेतली तसेच संचलन केले याचे नेतृत्व सी क्यू .एम. एस. रुद्र तांबे व त्याचे सहकारी सार्जंट मृणालिनी घोरपडे, ऑल इंडिया कॅम्प मास्टर्स विनर श्रवण चव्हाण यांनी केले .

तसेच १० वी च्या विद्यार्थ्यांचा व १२ वी च्या कला , वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करून सत्कार करण्यात आले.
यामध्ये इयत्ता १० वी मधील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी जानवी लांडगे , सई शिंदे, वेदांतिका कणसे पाटील, श्रेया कदम

तर इयत्ता १२ वी मधील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी
कला शाखा – यशराज मदने , अंजली कदम , सई चव्हाण
वाणिज्य शाखा – अश्विनी नेवसे, प्रणिता कांबळे , पूनम कचरे
विज्ञान शाखा – सिद्धांत साळुंखे,सई सुर्वे, संस्कृती फरांदे
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा – आध्या केदार खिलारे
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा – प्रगती बनकर, स्वरा हरिहर
शाळाबाह्य शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा ( एम टी एस परीक्षेमध्ये राज्यात सातवा क्रमांक)- सुयश दोशी
फलटण नगर परीषद व फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त बिद्यार्थिनी – स्वरांजली अमोल नाळे या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या वीर दोशी या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक जीवराज दोशी यांना स्वतः काढलेले महात्मा गांधी यांचा फोटो भेट म्हणून दिला.

यावेळी क्रीडा विभागाचे श्री तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत/संचलन देशभक्तीपर गीताच्या तालासुरात सादर केले. हे सादरीकरणाने परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्मिती केली व देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी त्याना या सांस्कृतिक कार्यक्रमास श्री भारत बोराटे ,श्री गणेश पाटील , सौ लोकरे मॅडम सौ राजपुरे मॅडम यांनी साहाय्यक मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.

यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्य नियामक मंडळाचे ट्रेझरर मा. श्री हेमंत रानडे ,फलटण सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री शिरीषशेठ दोशी , मा. श्री रणजित निंबाळकर, मा. श्री भोजराज नाईक निंबाळकर , मा. श्री संजय भोसले , मा. श्री नितीन गांधी, मा.सौ वसुंधरा नाईक निंबाळकर , बोर्ड ऑफ ट्रस्टीज मा श्रीमती उषादेवी भोसले, मा. श्री चंद्रकांत पाटील , प्रशासन अधिकारी मा. श्री अरविंद निकम, शाळा तपासणीस मा. श्री दिलीप राजगुडा, मा श्री सुधीर अहिवळे , माजी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक बी बी खुरांगे, प्राचार्य श्री वसंत कृष्णा शेडग, ज्युनिअरचे उपप्राचार्य मा. श्री सोमनाथ माने, माध्यमिकचे उपप्राचाार्य मा श्री आण्णासाहेब ननवरे , पर्यवेक्षक मा श्री आर बी निंबाळकर, मा श्री विजय पाटील, सौ पूजा पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , माजी विद्यार्थी , पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जमदाडे व संजय गोफणे यांनी केले.


