लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा संपन्न

विठ्ठल रुक्मिणी वेशभूषा मध्ये लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचे विद्यार्थी

फलटण टुडे वृत्तसेवा (जळोची दि२० जुलै २०२६):-
बारामती येथील लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजनाने व आरतीने झाली. संगीत शिक्षक अनिल काशीद आणि संतोष जाधव यांनी सादर विठ्ठल रुक्मिणी यांची भजने सादर केली
यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. मुलांनी कपाळावर बुक्का लावून वारकरी रूप धारण केले, तर मुलींनी नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेत वारीची परंपरा जिवंत केली. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील चिमुकल्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

Screenshot


यावेळी संस्थेच्या संचालिका शुभांगी लडकत, प्रियांका लडकत,
व संस्थेचे प्रमुख चेअरमन नामदेव लडकत, सचिव गणेश लडकत, खजिनदार दत्तात्रय लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ आणि तानाजी गवळी आदी मान्यवर उपस्तीत होते.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!