फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. २० जुलै २०२६ ):-
फलटण येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध ज्येष्ठ मुद्रण व्यावसायिक, विद्यामृत प्रकाशन व प्रिंटींग प्रेसचे प्रमुख बकुळ पराडकर यांचे पुणे येथे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५:०० वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अनुबंध कला मंडळाच्या माध्यमातून फलटण शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात ते अग्रभागी होते. त्यांच्या पश्चात 2 मुले असा परिवार आहे.

