महात्मा एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..


फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १६ ऑगस्ट २०२६):- भारतीय स्वातंत्र्याच्या ७९व्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या वतीने चतुराबाई शिंदे बालक मंदिर, श्रीराम विद्यामंदिर प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ होते. भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शांताराम आवटे, माध्यमिक शालेय समितीच्या अध्यक्षा अलका बेडकीहाळ, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र बर्गे तसेच बालवाडी शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे, ‘समर्थ नायक’चे संपादक गणेश भोईटे, सहसंपादक हिंदुराव आप्पा गायकवाड, ‘कसबा न्यूज’चे संपादक योगेश गंगतीरे, दैनिक ‘सकाळ’चे वार्ताहर अशोक सस्ते, दीपक मदने, पत्रकार शेखर गायकवाड, शेखर करचे, सचिन वाघ, मधुकर बनकर आणि पारस शहा आदी उपस्थित होते.
चतुराबाई शिंदे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवणे, श्रीराम विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!